घटनेची संपूर्ण माहिती घेऊन आंबेडकरी अनुयायी यांना शांतता राखण्याचे आवाहन!
परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) शहरातील परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ एक अज्ञात इसमानी दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर जाण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु तेथील सुरक्षा गार्ड तुळशीराम बोबडे यांनी त्या इसमास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जाण्यास मज्जाव करत रोखले होते. परंतु तो इसम स्मारक सुरक्षा गार्ड तुळशीराम बोबडे यांना धक्काबुक्की करत मला वर जायचं आहे मला रोखू नका. तेव्हा सुरक्षा गार्ड यांनी समोरच असलेल्या ट्राफिक पोलीस श्री पवार साहेब यांच्या साह्याने त्या इसमास पकडून नवा मोंढा पोलीस स्टेशन च्या हवाले करण्यात आले आहे. या घटनेची वंचित बहुजन आघाडीला माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष(उत्तर) गणेश गाढे, परभणी तालुका अध्यक्ष(उत्तर) प्रमोद अशोकराव अंभोरे, मोहन गाडे, प्रताप पंडित, सचिन शिंदे, योगेश पंडित, सुमेध काळे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय नंद, सामाजिक कार्यकर्ते कैलास भाऊ पतंगे आदींनी तात्काळ घटनास्थळीचे भेट घेऊन संपूर्ण माहितीचा आढावा घेऊन नवा मोंढा पोलीस स्टेशन येथिल पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून सदरील घटनेची माहिती मिळवली. पोलीस निरीक्षक यांनी घटनेचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पदाधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला कुठल्याही प्रकारची नुकसान करण्यात आल्याचे कुठेही दिसून आले नाही. त्यामुळे ही अफवा असून तो इसम फक्त बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी स्मारकावर जाण्यासाठी जिद्द करत होता. सदरील प्रकरणात पूजनीय भंते मुतीदानंद, परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की , कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका भीम अनुयायी यांनी शांतता राखावी असे आव्हान केले आहे. यावेळी आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

