परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) दिनांक ०३/०१/२०२५ रोजी मौजे पारवा शिवारात शेतातील आखाडयावर परवा शिवार येथे दिनांक ०३/०१/२०२५ रोजी रात्री अनोळखी पाच इसमांनी आखाड्यावर येवुन पीडीतेववर शारिरीक अत्याचार करुन त्यांचे पतीला डोक्यावर हत्याराने जखमी करुन जबरदस्तीने सोने चांदीचे दागीन चोरु नेले वगैरे जबाबावरुन विषयात पोस्टे परभणी ग्रामीण येथे गुन्हा दाखल झाला होता. दिनांक १२/०२/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातला सदर गुन्हयातील फरार आरोपी नामे गुप्ता ऊर्फ सुरेश शंकर शिंदे वय २४ वर्षे रा पांगरी ता. परळी जि.बिड ह.मु.रेल्वे पटरी जवळ पुर्णा जि परभणी हा सध्या पुर्णा परीसरात लपून छपुन राहत असल्याची गोपनिय व खात्रीशीर माहीती मिळाली सदरची माहीती वरुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने पुर्णा येथून नामे गुप्ता ऊर्फ सुरेश शंकर शिंदे वय २४ वर्षे रा पांगरी ता. परळी जि.बिड ह.मु. रेल्वे पटरी जवळ पुर्णा जि परभणी यास ताब्यात घेतले सदर आरोपीस पुढील कारवाई कामी पोस्टे परभणी ग्रामीण येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास पो.नि.पो.स्टे. परभणी ग्रामीणी श्री. श्रीकांत डोंगरे हे करीत आहेत. सदरची कार्यवाही मा. श्री. रविंद्रसिंह परदेशी पोलीस अधिक्षक परभणी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. यशवंत काळे अपर पोलीस अधीक्षक परभणी यांचे नेतृत्वात श्री. विवेकांनद पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांचे पथकातील सपोनि श्री. मुत्येपोड सोबत पोउपनी श्री. अजित बिरादार, पोलीस अंमलदार एएसआय चटटे, एएसआय जक्केवाड, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, किशोर चव्हाण, जमीरोददीन फारुखी, निलेश परसोडे, गणेश कौटकर यांनी मिळून केली आहे.

