परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) महाराष्ट्र शासन मा. मुख्यमंत्री महोदयांच्या " 100 दिवसांचा कृती आराखडा " प्राधान्याने करावयाची कामे 07 कलमी कार्यक्रम या अंतर्गत इतर विभागाप्रमाणेच जिल्हा पोलीस दल परभणी सुद्धा सदर 07 कलमी कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कामकाज करत असून. सदर 7 कलमी कार्यक्रमात शासकीय कार्यालय व परिसर या ठिकाणची स्वच्छता याला महत्व दिले असून त्या दृष्टीनेच पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशन या ठिकाणी नियमितपणे स्वच्छता मोहीम / श्रमदान राबविले जात आहे.
दिनांक 16 फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन नवामोंढा, परभणी ग्रामीण, पालम, चुडावा, पिपंळदरी, पाथरी, मानवत, चारठाणा, बोरी या पोलीस स्टेशन इमारत व परिसरात स्वछता मोहीम/ श्रमदान करून परिसर सर्व स्वच्छ करण्यात आला तसेच ताडकळस येथे स्वछता मोहीम सोबतच पोस्टे परिसरात सौंदर्यकरण दृष्टीने वृक्षारोपण करण्यात आले. सदर मोहिमेत संबंधित पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुय्यम पोलीस अधिकारी , पोलीस अंमलदार व होमगार्ड यांनी सहभाग घेतला होता.

