लोक स्वातंत्र पत्रकार महासंघ जिल्हा परभणीचा स्तुत्य उपक्रम
परभणी (वृत्त संपादक राजकुमार मनवर) संपूर्ण भारतभर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी
एकमेव संघटना केंद्रशासन नीती आयोग संलग्नित एक समाजाभिमुख सामाजिक संघटना लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या वतीने संपूर्ण भारतभर लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. संजय एम. देशमुख यांच्या व मराठवाडा अध्यक्ष ऍड.नरसिंग सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार पत्रकार दिन मोठ्या उत्साहामध्ये तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने आज दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा परभणी कार्यालय डॉ.आंबेडकर नगर आय.टी.आय. कॉर्नर जिंतूर रोड परभणी येथे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्या आयोजनातून महाराष्ट्र संघटक तथा संपर्कप्रमुख मा. भगीरथ बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित मान्यवरांच्या वतीने मराठी पत्रकार चे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित पत्रकारांना नोट पॅड, पेन, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
व गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वही पेनचे वाटप करून मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी भगीरथ बद्दर वाजेद खान, देवानंद वाकळे, ऍड.रियाज भाई, दिलीप बनकर, प्रमोद अंभोरे, मदनबापु कोल्हे आदींनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र संघटन प्रमुख भगीरथ बद्दर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन रिपोर्टस असोसिएशन चे (इरा) प्रदेशाध्यक्ष मदन बापू कोल्हे, ऍड.जगदीश पवार, दिलीप बोरुळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे, मराठवाडा विभागीय डिजिटल मीडिया अध्यक्ष वाजिद पठाण, डिजिटल मीडिया जिल्हा अध्यक्ष राहुल धबाले, मराठवाडा विदर्भ संघटक देवानंद वाकळे, ज्येष्ठ पत्रकार युनूस , संदीप वायवळ, विकास टोंगराज, परभणी शहर संघटन प्रमुख शेख कलीम, मभुड खान पठाण , पत्रकार ए. के.अखिल, पत्रकार शैलेश डहाळे, शिवाजी कोकाटे, हरिभाऊ सुतारे, शेख इसाक, राजकुमार मनवर, हरदीप सिंग बावरी, राजाभाऊ येटेवाड, बाळू भाऊ धिके, राहुल मगरे, शिवाजीराव चव्हाण, गोपाल कचवें, जावेद सिद्दिकी, नामदेव चापके,कलीम कुरेशी, अब्दुल रहमान खान पठाण, प्रकाश अंभोरे, संदीप ढाले, बालाजी कांबळे, उमेश अग्रवाल, ऍड.सुभाष अंभोरे, विष्णू चापके आदींनी परिश्रम घेतले.
तसेच उपस्थित मान्यवरांच्या वतीने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.


