परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) शहरातील पंचशील नगर येथील संविधान चौक येथे भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. या अभिवादन कार्यक्रमांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या उन्नतीच्या मार्गावर अविरतपणे आपण चालले पाहिजे असा सर्व उपस्थितांनी संकल्प केला. या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ पदाधिकारी डी आय पोटफडे, बी जी शिंदे, बाबासाहेब धबाले, अतुल वैराट तसेच वंचित बहुजन आघाडीचे सुमित भालेराव, रंजीत मकरंद, गणेश गाढे, दिलीप बोरकर आदी सोबतच मोठ्या प्रमाणावर बौद्ध उपासक उपासिका व परिसरातील नागरिक उपस्थित होते. या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सिद्धोधन धबाले यांनी केले होते.

