
सेलू (प्रतिनिधी डॉ. शिवाजी शिंदे) दि.04 सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कापूस खरेदी बीट हे बाजार समिती च्या गलथान कारभारा मूळे अद्याप सुरु झालेले नाही. ते तात्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूचे संचालक डॉ. संजय रोडगे यांच्या नेतृत्वा खालील एका शिष्ट मंडळाने केली आहे. सेलू तालुक्यातील तसेच ईतरही तालुक्या तील शेतकरी आपला कापूस विक्री करण्या करीता सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीस पहिली पसंती देत आहेत. याठिकाणी सर्वात जास्त जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी असल्यामुळे कापसाला चांगला भाव मिळत आहे, असे नूमद करीत जिल्ह्या तील इतर ठिकाणी बाजार समितीच्या माध्यमातून कापूस खरेदी बीट सुरू आहेत, परंतु सेलू येथील कापूस खरेदी बीट सुरू न झाल्याने पुन्हा शेतकर्याची अडवणूक केली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे कापूस खरेदी बीट तात्काळ सुरु करण्यात यावे अन्यथा शेतकर्यांच्या प्रश्ना वरती तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संचालक डॉ. संजय रोडगे, शैलेश तोष्णीवाल, रामेश्वर राठी, अॅड. दत्तराव कदम, सौ. गोकर्णा पडघन, अनिल पवार, सौ. अनिता माऊली ताठे व वर्षा केशव सोळंके आदींनी कृषि उत्पन्न बाजार समिती स सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.