मानवत / ( समाजहीत न्यूज वृत्तांत ) राज्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून निवडणूक आयोगाच्या वतीने सर्वतोपरी उपाय योजना करण्यात येत असून मतदाना चा टक्का वाढावा याकरिता सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून नगरपरिषद मानवत च्या वतीने वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाचा टक्का वाढावा समाजातील सर्व घटकापर्यंत मतदानाची जनजागृती व्हावी व त्यांनी मतदानाचा हक्क बजावा याकरिता वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. सध्या संपूर्ण देशामध्ये दीपावली पर्वाचे आगमन झाले आहे. दीपावली सणाच्या माध्यमातून सुद्धा नगर परिषदेच्या वतीने मतदान जनजागृती करण्यात आली आहे एक दिवा मतदानासाठी या उपक्रमाचे आयोजन नगरपरिषद मानवत च्या वतीने करण्यात आले होते यासाठी श्री. आनंद नांदगावकर यांच्या पुढाकाराने नगरपरिषदेच्या आवारामध्ये एक दिवा मतदानासाठी ही जनजागृती पर रांगोळी साकारण्यात आली होती याच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकातील लोकांनी मतदान करून लोकशाही वृद्धिंगत व बळकट करावी. हा संदेश देण्यात आला यावेळी श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांनी सर्व शहरवासीयांना दीपावली च्या शुभेच्छा दिल्या तसेच मतदाना साठी सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन सर्व स्तरातील मतदार राजाने आपले मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले. यावेळी नगर परिषद मानवत अधिकारी कर्मचारी यामध्ये श्री. सय्यद अन्वर, नगर अभियंता श्री. महेश कदम, लेखापाल, श्री. हारकळ लेखापाल, श्री. भगवानराव शिंदे, श्री. भोसले स्थापत्य अभियंता, श्री. काशिनाथ धुळगुंडे स्थापत्य अभियंता, श्री. रामराव चव्हाण, श्री. भारत पवार, श्री. राजेश शर्मा, श्री. विनय आडसकर, श्री. शतानिक जोशी, श्री. संतोष खरात, श्री. अजय उडते, श्री. संतोष उन्हाळे, श्री. हनुमंत बिडवे, मुंजाभाऊ गवारे, श्री. संजय रुद्रवार, श्री. दीपक सातभाई, श्री. मनमोहन बारहाते, श्री. भगवानराव बारटक्के, श्री. रवि दहे, श्री. पंकज पवार, श्री. सचिन सोनवणे, श्री. नारायण व्यवहारे, वसीम शेख, श्रीमती वंदना इंगोले, श्री. मुंजाभाऊ डोळसे, श्री. सोनाजी काळे, श्री. नारायण काळे, श्री. संजय कुऱ्हाडे, श्री. एम स्वामी, श्री. अलीम, श्री. जावेद मिर, श्री निवृत्ती लाड, श्रीमती सीमा कंची, श्रीमती सुनीता वाडकर, भारती भदर्गे, श्री. सुनील कीर्तने, श्री. दीपक भदर्गे, कांचन झोडपे, बाबाराव जोंधळे यांच्या सह मानवत नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

