सेलू (प्रतिनिधी डॉ. शिवाजी शिंदे) दि. 02 ऑक्टो. रोजी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित आणि 'स्वरांगाण' प्रस्तुत 'दिवाळी पहाट' हा कार्यक्रम सेलूकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. माझे प्रेरणास्थान प्रसिद्ध उद्योजक आदरणीय आर.बी.घोडके साहेब, आणि शिक्षणाधिकारी मा.विठ्ठलभुसारे यांच्या हस्ते सेलू शहराचे ग्रामदैवत श्रीकेशवराज बाबासाहेब महारांजा च्या प्रतिमा पुजनाने 'दिवाळी पहाट' या कार्यक्रमाला सुरूवात झाली. यंदाचं हे तिसरं वर्ष. तिन वर्षांपूर्वी आम्ही सेलूत हा पहिला प्रयोग केला. त्यावेळी दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाला लोक येतील का नाही.? सेलूत हा कार्यक्रम यशस्वी होईल का.? एक दोघांनी तर विचारलं की कार्यक्रम सकाळ च्या सहाला आहे का.? सायंकाळच्या ..? अशा अनेक प्रश्नांना आणि संभ्रमाना सोबत घेऊन आम्ही दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर 'दिवाळी पहाट' हा कार्यक्रम सुरू केला. या वेळी अशोक काकडे यांनी आपल्या मनोगतात सेलूकरांचे खुप खूप आभार व्यक्त करीत या कार्यक्रमाला तिन वर्षे झाली आहेत. आणि आज तिसऱ्या वर्षीही सेलूकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दिवाळी पहाट संपन्न झाली आहे. ही गोष्ट माझ्या सारख्या कार्य कर्त्याला खूप बळ देणारी आहे. मी माझं भाग्य समजतो की आपले आराध्य दैवत श्री केशवराज बाबा साहेब महारांजाच्या यात्रेनिमित्त मला आणि माझ्या कुटुंबीयांना मिळाले ल्या पगंतीचा मान असेल अथवा श्री केशवराज फेस्टीवल या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन असेल किंवा आजची ' दिवाळी पहाट असेल या सारख्या कार्यक्रमा च्या माध्यमातून मला आपली सेवा करता येत आहे. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.कोठेकर सर, प्रेक्षाताई भांबळे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या सह सामाजिक, शैक्षणिक,व्यावसायिकवैद्यकीय,उद्योग नोकर दार,कला, साहित्य आदी सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. स्वरांगण' ग्रुपचे मुख्य संयोजक सच्चिदानंद डाखोरे, पुजा तोडकर, मधुप्रिया कांबळे, लक्ष्मीकांत दिग्रसकर या गोड गळ्यांच्या गायकांनी भक्ती गितं लोकमनातली गाणी गाऊन रसीकांची मने जिंकली तर गिरीश दिक्षीत, कार्तिक हिंगणे, नईम शेख, श्रीनिवास लंकावाड, संदीप पुंडगे,प्रणव जोग यांनी अतिशय छान साथ संगत करीत मैफील उंचीवर नेली. निवेदनासाठी खास छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या महेश अचिंतलवार यांनी प्रभावी निवेदन करून रसिकांची प्रचंड दाद मिळवली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष कुलकर्णी सर,अशोक उफाडे, मोहन बोराडे, किशोर कटारे, राधा किशन महाराज गोरे पुरूषोत्तम गिरी, संदीप काष्टे, आकाश डासाळ कर, सिध्देश्वर शिंदे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल संयोजक अशोक काकडे यांनी सर्व सेलू करांचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त केले.


