प्रसिद्ध प्रबोनधकार गायिका आयु.वैशाली शेंडे विरुद्ध आयु संविधान मनोहरे यांच्यात बोदेगांव येथे रंगणार सामना!
यवतमाळ (समाजहित न्यूज वृत्तांत) 75 व्या भारतीय संविधान दिनानिमित्त दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी बुद्धिस्ट बहुउद्देशीय समिती बोदेगांव ता. दारव्हा जिल्हा यवतमाळ यांच्या मुख्य आयोजनातून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारतीय संविधान सन्मान दिन समारोह चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध कार्यक्रम सोबतच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित "गौरव गीतांचा महामुकाबला" सामन्याचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. हा सामना
प्रसिद्ध प्रबोधनकार गायिका आयु.वैशाली शेंडे व त्यांचा संच नागपूर विरुद्ध आयु.संविधान मनोहरे व त्यांचा संच अमरावती यांच्यात दिनांक 26 नोव्हेंबर रोजी बस स्टॅन्ड रोड शुगर फॅक्टरी जवळ सेवादान भवन बोदेगांव ता.दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे सायंकाळी 7:00 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव पाटील तर कार्यक्रमाचे उद्घाटक सौ. उमिता सुखदेव राठोड यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून भिक्कूनी संघशीला थेरी कारंजा(लाड), पूज्य भिक्कूनी बुद्धकन्या थेरी श्रीलंका हे असणार आहेत. या गौरव गीतांच्या महामुकाबला कार्यक्रमला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक बुद्धिस्ट बहुउद्देशीय समिती तसेच प्रसिद्ध प्रबोधनकार गायिका आयु.वैशाली शेंडे यांनी केले आहे.

