परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) शहरातील आवरीत शैक्षणिक कार्य करणारे शैक्षणिक संस्था माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वस्तीग्रह व शहरातील समाज हितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत करून परभणी शहरातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी समाजहित मोफत कोचिंग क्लासेस चालवत विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण करून देण्यास प्रयत्नशील असणारे, तसेच गोरगरीब गरजू रुग्णांच्या मदतीसाठी निःस्वार्थ अहोरात्र धावून जाऊन रुग्णहितार्थ कार्य करणारे, गरजू रुग्णांसाठी होईल ती सेवा तसेच गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सदव्य कार्यशील असणारे, कोरोना काळात अनेक गोरगरीब, गरजू , निराधार लोकांना होईल ती मदत , भुकेल्याना अन्नदान, भिक्षावृत्ती करणाऱ्या गरजू महिलांना मोफत साड्यांचे वाटप, निराधारांना थंडीपासून बचाव करण्यासाठी रग देऊन मदत करणारे, गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, सनासुदा निमित्त गरजू लोकांना मिठाई, फराळ वाटप, गरजू रुग्णू रुग्णाच्या नातेवाईकांना फळ वाटप, शहरातील महिला वृद्धाश्रमात विविध सामाजिक उपक्रम राबवून मदत करणारे, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरा करून त्यांचे विचार तळागाळापर्यंत जाण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे, समाज हित न्यूज चॅनलच्या माध्यमातून व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या माध्यमातून गोरगरीब गरजूंची, अन्यायग्रस्तांची बाजू व्यथा निर्भीडपणे मांडून अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे, पत्रकांवर होणाऱ्या वारंवार हल्ल्या विरोधात रस्त्यावर उतरून त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे असे अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक, राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेऊन कार्य करणारे वंचित बहुजन आघाडी चे परभणी तालुका अध्यक्ष ( उत्तर विभाग ) तथा समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष, लोक स्वतंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष, सचीव - माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी, तथा परभणी जिल्हा कार्याध्यक्ष दयावान सरकार महाराष्ट्र राज्य, संस्थापक संपादक समाजहित न्यूज महाराष्ट्र राज्य प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन यांना संविधान दिनाच्या औचित्य साधून रुग्णहक्क संरक्षण समिती आयोजित "राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार 2024" हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा शाखा परभणी च्या वतीने परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी केले आहे. हा पुरस्कार सोहळा दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी परभणी शहरातील एसपी ऑफिस समोरील पत्रकार भवन येथे आयोजित केला आहे. या पुरस्कार सोहळ्याचे वितरण परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. रघुनाथ गावडे यांच्या हस्ते वितरित होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंजि. आर.डी.मगर हे तर उद्घाटक परभणी जिल्हाधिकारी मा. रघुनाथ गावडे हे असणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सत्ता इनामदार, ऍड.निलेश करमोडी, हनुमंत गोत्राळ, शिवाजीराव चव्हाण, रेणुकाताई बोरा, अनिताताई सरोदे, हाजी शरीफ शेख, खदीरलाल हाश्मी, शरीफ चारठाणकर, तब्बू पटेल, प्रमोद कुटे, प्रमोद अंभोरे, महबूब शेख, वाजिद खान पठाण, शिवशंकर सोनवणे हे असणार आहेत. या पुरस्कार निवडीचे पत्र दिनांक 26 नोव्हेंबर रोजी पुरस्कार सोहळ्याचे आयोजक दिलीप बनकर व शेख सरफराज तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा शहर अध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे यांच्या हस्ते प्रमोद अंभोरे यांना देण्यात आले आहे.
"राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार 2024" प्रमोद अशोकराव अंभोरे यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या वर सर्वच क्षेत्रातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.


