पुणे (समाजहित न्यूज वृत्तांत) दि.३० आक्टोबर रोजी संजिवनी हाॅस्पिटल पुणे येथून रुग्णांच्या नातेवाईकांचा पुणे शहराध्यक्ष संजय बावळेकर यांना फोन आला संबंधितांचे आई किडणी विकाराणी त्रस्त असल्या कारणाने त्यांना हाॅस्पिटल मध्ये ICU मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी त्यांना 87434 रुपये बिल करण्यात आले व औषध वेगळे पण् त्यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना हाॅस्पिटलचे बील भरणे अशक्य होते तेव्हा त्यांना शहराध्यक्षांचा फोन द्वारे त्यांना मदतीसाठी विनंती केली असता अवघ्या काही मिनिटांत शहराध्यक्ष संजय बावळेकर यांनी मदतीसाठी हाॅस्पिटल गाठले व संबंधित डॉक्टर व अकाउंट विभागात जाऊन त्यांना विनंती केली पण् ते ऐकण्यासाठी तयार नव्हते त्यांनी उपचारापुर्वी नातेवाईकांना बिलाची कल्पना दिलेली होती तेव्हा शहराध्यक्ष यांनी हाॅस्पिटल विरोधात आंदोलन व तक्रार करण्यात येणार असा ईशारा दिला तेव्हा त्यांनी योजनेतून करण्यासाठी तयारी दाखवली जिवाच्या भितीने व नाते जगवण्याच्या जबाबदारी मुळे त्यांनी होकार दिला पण् संपूर्ण बिलाची रक्कम जमा झाली नाही व हाॅस्पिटल त्यासाठी तगादा लावत होता. तेंव्हा रुग्ण हक्क संघर्ष समिती कडे संपर्क केला असता संजय बावळेकर यांनी त्यांना संपुर्ण उपचार पुणे महानगरपालिका शहरी गरीब योजनेतून करून दिले व रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांनी भरलेली रु.35000 भरलेली रक्कम परत मिळवून दिली.
रुग्ण हक्क संघर्ष समिती पुणे शहराध्यक्षांनी आंदोलनाचा ईशारा देताच संपूर्ण बील झाले कमी*
October 31, 2024
0
Tags

