परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) परभणीतील दरगाह रोडवर असलेल्या आयफकॉनिक टॉवरमध्ये आयझोन मॉल चे भव्य उद्घाटन संपन्न झाला. परभणीत प्रथमच एक्सप्रियन्स कम्प्लीट आयझोन शॉपिंग मॉलचे रविवारी 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वा.भव्य दिव्य शुभारंभ समारोह पार पडला. या उद्घाटन प्रसंगी रेल्वे काँट्रॅक्टर एजाज फारुकी,आयझॉन मॉलचे (सी.ई.ओ) नमिशता फारोखी,चीफ गेस्ट म्हणून हैदराबाद येथील सुपरस्टार फिल्म अभिनेते अदनान साजिद खान उर्फ (गुलू दादा), एजाज नसीर (जहांगीर) यांचे शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आले. यावेळी परभणी जिल्ह्यातील हजारो नागरिक उपस्थित होते. त्याचप्रमाणे उद्घाटनानिमित्त तुराबुल हक नगर मैदानावर प्रसिद्ध सुफी गायक सामी सौदागर यांच्या शाम-ए-गझल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो श्रोत्यांनी गझल गायकीचा आस्वाद घेतला. शाम-ए-गझल या कार्यक्रमाचे सूत्र संचलन औरंगाबादच्या प्रसिद्ध अँकर मीनाक्षी बालकमाल यांनी केला, आयझोन मॉलचे भव्य उद्घाटन एखाद्या नेत्रदीपक अनुभवापेक्षा कमी नव्हते,ज्यामध्ये आकर्षक फटाक्यांची आतषबाजी आणि आकर्षक प्रकाश प्रदर्शनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। जेव्हा हैदराबादी चित्रपट सुपर स्टार अभिनेता अदनान साजिद खान उर्फ (गुलू दादा), एजाज नसीर (जहांगीर) अचानक मॉलमध्ये दाखल झाले, तेव्हा त्यांना पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. अनेक स्क्वेअर फूट पसरलेल्या आयझोन मॉलने 'आधुनिक' लोकभावना प्रतिबिंबित केली ,पारंपारिक सौंदर्य आणि समकालीन शैलीच्या मिश्रणासह उत्कृष्ट खरेदीचा अनुभव परभणीकरांना सर्वात कमी दरात भेट म्हणून मानले जात आहे.
परभणीत आयझोन मॉलचे थाटामाटात उद्घाटन
October 28, 2024
0
Tags


