डोंबिवली (कार्यकारी संपादक ऍड.सुभाष अंभोरे) येथील अमृतवेल हेल्थकेअर वेलफेयर फाउंडेशन या संस्थेच्या वतीने वयोवृद्ध गरजू आजी आजोबांच्या सेवेसाठी डॉ. सुनील जाधव व डॉ. संदीप पाईकराव यांच्या संकल्पनेतून "स्वरकुंज ओल्ड एज होम" चा उदघाटन सोहळा आज दिनांक 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सकाळी 11:45 मिनिटीला मेडिकअर हॉस्पिटल, एन एक्स,1 ला मजला, नांदिवली गाव डोंबिवली (पूर्व) येथे पार पडणार आहे. या ओल्ड एज होम मध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा 24 तास डॉक्टरांच्या चेकअप व सल्यांची सोय अडमिट करण्याची सुविधा 24*7 सेवा (दिवसरात्र), नर्सिंग केअर 24*7 सेवा, मेडिकल सेवा, ड्रेसिंग ट्रॉली ऑटोक्लोव्ह मशीन, जेवण आजारानुसार संतुलित आहार, सर्व प्रकारचे रक्त व लघवी तपासणी, प्रत्येक पेशन्ट लक्ष, सर्व प्रकारचे ऍम्ब्युलन्स सेवा, घरासारखे वातावरण व वयक्तिक स्वच्छता, वृद्धाश्रमात कायमस्वरुपी राहण्याची सोय, चोवीस तास मदतनीस असतात,पेशन्ट चे नातेवाईक तब्येती संदभार्त, डॉक्टरांशी संवाद साधू शकतात, 50 बेड उपलब्ध अशा सुविधा असणार आहेत. तसेच सदरील सेंटर मध्ये पॅरालिसिस, कॅन्सर, बेड रिडन, डायबेटिज, मेंदूचे ऑपरेशन झालेले पेशंट, बेड सोर्स, बेशुद्ध पेशंट (कोमामध्ये गेलेले) विविध दीर्घ आजार असलेले पेशन्ट, ऑपरेशन झाल्यानंरतची केअर दुसऱ्यावर अवलंबून असलेले वृद्ध, संधिवात, गुडघे दुखी पेशन्ट, किडनी आजार असलेले पेशन्ट, सर्व प्रकारच्या रुग्ण व वर्द्ध कायमस्वरुपी सामावले जातील अशा प्रकारचे उपचार केले जातील अशी माहिती डिरेक्टर डॉ. सुनील जाधव व मॅनेजिंग डिरेक्टर तथा दयावान सरकार महाराष्ट्र राज्य कल्याण-डोंबिवली शहर अध्यक्ष डॉ. संदीप पाईकराव यांनी दिली आहे.
संस्थापक संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

