'नव्या जगाची आशा, शेतकरी राजा' सांस्कृतिक कार्यक्रमाने रसिकांची मने हेरली !
नांदेड/ धर्माबाद(धर्माबाद तालुका प्रतिनिधी नारायण सोनटक्के)धर्माबाद शहरातील शैक्षणिक क्षेत्रात प्रगती पथावर असणारे गुरुकुल विद्यालयात गणराज्य दिनांचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणांचा विकास व्हावा व भावी आयुष्यात विद्यार्थी भारतीय संस्कृतीचे जोपासना करावे असा मुळ आशय उरशी बाळगून सांस्कृतिक कार्यक्रम 'नव्या जगाची आशा, शेतकरी राजा' दिनांक 31 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने रसिक उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. गणपती नृत्य,देशभक्तीपर गीत, नाटिका, आदिवासी गीत, लावणी, गोंधळ, कोळीगीत अशा विविध संस्कृती जपणाऱ्या कलाकृतीने धर्माबादकर भारावून गेले. पाण्याचे योग्य नियोजन करावे असा संदेश देणारे किर्तन बादेवाड शिवम, गाजूलवार रुद्र, छपरे अथर्व, कदम शाम, पाटील मानव, जाधव सुरज, जाधव अनिकेत, बोंबले दीपक, कदम निर्गुण यांनी सादर केले. 'पेराल ते उगवेल' या एकांकिकेने प्रेक्षकांना विचार करावयास भाग पाडले. कळसे ज्योती, बोंबले वैष्णवी, जाधव अमोल, बादेवाड शुभम, चिंचोलकर मंगेश यांनी उत्कृष्ट अभिनय केला. 'अंबाबाई गोंधळाला ये' या गोंधळ गीताने जाधव साक्षी शिलारवार रितिका, शिंदे तनुजा, ईरलोड समीक्षा कोमटवार ऋतुजा, सूर्यवंशी निकिता मरकंटी दुर्गेश्वरी,सोनकांबळे अनुष्का, जायशेठ नंदिनी, मुर्के श्रुती, पाटील सूरज यांनी विविध मनोरे रचत रसिक प्रेक्षकांना माना डोलावयास भाग पाडले.लोकगीत 'लिंबोणीचं लिंबू' या गाण्याने कार्यक्रमात रंगत भरली. भोजराज सेजल, नुतीवाड साक्षी, नुतिवाड गायत्री, ढगे साक्षी, कारलापोड रुतिका, राचेवाड दुर्गा, शंबोले वैधवी, राचेवाड साक्षी या विद्यार्थीनींनी उत्कृष्ट नृत्य सादर केले. 'ही मायभूमी ही जन्मभूमी' या महाराष्ट्र गीताने महाराष्ट्राचा, कलेचा गौरव या गीतातून सादर केला. शिल्लारे सान्वी, जगदंबे समीक्षा, पटणे शताक्षी, पांचाळ तेजल, शिंदे रागिनी, शिंदे कृतिका, शेनपुंजे संस्कृती, आरे पौर्णिमी, शिंदे अनुष्का, कदम वैष्णवी, दोरणाल संस्कृती, भुरे अनुष्का, सोनटक्के यशोदीप यांनी आपल्या नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रा. का. विद्यालयाचे संचालक सुनील श्रीवास्तव, बुलढाणा अर्बन बँकेचे कॅशिअर रंगनाथ ठाकर, उपसंपादक सुधाकर जाधव यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या सचिव शोभा गोपतवाड, निर्मला नरेंद्र रेड्डी, ज्योती दगडगावे, निकिता आगलावे, नरसारेड्डी चाकरोड हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण बनसोडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक मनमोहन कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षिका बाबळे, कुरे, पाटील, सुवर्णकार, लासीनकर, नरडेवाड, आंबेराव, तुपसाखरे, गैनवार, दिंडे, मदनूरे, सूर्यवंशी, चिमलवाड, संतोष सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले.
संस्थापक संपादक प्रमोद अशोकराव अंभोरे :8530935821✍️✍️



