परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) शहरातील सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था ऐकता सेवाभावी संस्थांच्या वतीने वक्फ बोर्ड चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेख मुशीर अहेमद यांचा त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचा आढावा घेऊन दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी दर्गा रोड येथील वक्फ बोर्ड उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेख मुशीर अहेमद यांच्या निवासस्थानी पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला आहे. यावेळी एकता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान, ज्येष्ठ समाजसेवक शेख अब्दुल करीम साहब, मोईन खान, शेख मुस्तफा, शायर कवी डॉ. मुनीब हनफी, ज्येष्ठ समाजसेवक शेख अब्दुल करीम साहब, अभिनेते बाबुराव साईना, सय्यद अली, समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा संपादक समाजहित न्यूज प्रमोद अंभोरे, भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ आदींचे उपस्थिती होती. हा सत्कार केल्याबद्दल शेख मुशीर अहेमद यांनी एकता सेवाभावी संस्थेचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आहे.
मुख्य संपादक प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

