नागरी समस्या तात्काळ नाही सोडविल्यास तीव्र आंदोलन करणार - युवा जिल्हा सचिव जनसेवक रमेश घनघाव
परभणी ( समाजहित न्यूज वृत्तांत ) शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर आयटीआय कॉर्नर जिंतूर रोड परभणी येथील तुंबलेल्या नाल्याच्या प्रश्नाबाबत प्रभागातील नागरिकांच्या वतीने वारंवार विनंती निवेदन देऊनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील नालीचा प्रश्न मार्गी न काढल्याने व रस्त्यावर आलेल्या नालीचे घाण पाण्याचे व्यवस्था न करणाऱ्या, कर्तव्यात कसूर करणाऱ्या व नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या प्रभाग समिती - ब च्या अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांना तात्काळ निलंबित करून सदरील नागरी समस्या सोडविणे बाबत आंदोलन करत असल्या बाबत या आशयचे दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी परभणी महानगरपालिका आयुक्त यांना वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा परभणी च्या वतीने युवा जिल्हा सचिव जनसेवक रमेश घनघाव यांनी निवेदन दिले आहे. अधिक माहिती अशी कि, गेल्या अनेक महिन्यापासून शहरातील डॉ.आंबेडकर नगर जिंतूर रोड परभणी येथील तुंबलेल्या नालीचा प्रश्न महानगरपालिकेला वारंवार विनंती निवेदने, तक्रार अर्ज करूनही सुद्धा सोडविण्यात आल्या नाहीत. सदरील नाली तुंबल्या कारणाने घाण पाणी हे रस्त्यावर आले आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांचे व सदरील भागात ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकीकडे भारत सरकारकडून कोट्यावधी रुपये खर्च करून स्वच्छता मोहिमा राबविल्या जात आहेत त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यात स्वच्छतेचे काम पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालेले दिसून येत नाही. परंतु परभणी महानगर पालिकेच्या वतीने सर्व माहिती असून सुद्धा जाणून-बुजून महानगरपालिकेचे प्रभाग समिती- ब चे सहाय्यक आयुक्त व स्वच्छता निरीक्षक हे कर्तव्यात व कार्यात कसूर दाखवून संबंधित प्रकरण हे सार्वजनिक बांधकाम विभाग च्या हद्दीतील असल्या चे दर्शवून सदरील नागरी समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जनसेवक रमेश घणघाव यांनी केला आहे. प्रभागातील नागरिकांच्या वतीने वारंवार त्यांना विनंती करूनही तात्पुरती व्यवस्था म्हणून नालीतले पाणी उपसा करून घेण्याच्या संदर्भात कळविले असता मनपा अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून काहीतरी उडवा उडवी चे उत्तरे देऊन समस्या सोडविण्यास टाळाटाळ करत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच कर्तव्यात व कार्यात कसूर करणाऱ्या मनपा सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती-ब व स्वच्छता निरीक्षक यांना तात्काळ पदावरून निलंबित करून त्यांच्या ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी नेमून ही नागरी समस्या तात्काळ सोडण्यात यावी. करिता डॉ. आंबेडकर नगर आय.टी.आय. कॉर्नर या ठिकाणी लवकरच आपल्या कार्यालयाच्या अनागोंद, मनमानी, सुस्त, कारभाराच्या विरोधात व जनसामान्यांच्या आरोग्य हितासाठी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा परभणी च्या वतीने दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा या निवेदणाद्वारे देण्यात आला आहे. त्याच बरोबर जोपर्यंत ही समस्या सोडल्या जात नाही व संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू असणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
या विषयाचे निवेदन च्या प्रत मा.उपायुक्त, परभणी महानगरपालिका, परभणी, मा.सहाय्यक आयुक्त, परभणी महानगरपालिका, परभणी प्रभाग समिती -ब, मा. पोलीस अधीक्षक साहेब,पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी, मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, मा.सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परभणी यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी निवेदन सादर करताना वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा सचिव जनसेवक रमेश घनघाव, लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप बनकर, रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब सावने, ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते नुरोद्दीन जावेद सिद्दिकी आदींची उपस्थिती होती.