परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर) महाराष्ट्र शासनाने सहकार भूषण पुरस्काराने गौरविलेल्या जलसंपदा कर्मचारी सहकारी पत संस्था मर्यादित वर्धा या संस्थेच्या अद्यावत संगणीकृत बँकींग प्रणालीनुसार कार्यान्वीत असलेल्या परभणी येथिल संस्थेच्या १७ व्या शाखेचा उद्घाटन सोहळा आज दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लघु पाटबंधारे विभाग परभणी चे कार्यकारी अभियंता हे होते. तसेच या वेळी प्रसाद लांब, सचिन घोळवे, आनंद गोकूळे, अंजू काळे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार धावडे, पंकज आगलावे, गौरव बुधोलिया, केशव जवादे, हेमंत ठाकरे, श्रीकांत मस्के, छगनलाल गायधने, मिथुन चांदोरकर, दत्तराव मस्के, विक्रम पाटील, सचिन देवगीरकर, सुनिल गजबे, गोपाल अवचार, गोविंद तागडे, विजय काकडे, मधुसूदन टेळकीकर, विशाल जिरवणकर, नितीन तराळे, रामेश्वर पवार, साहेबराव अंभोरे, आरती तायडे, दिप्ती सबाने आदींनी परिश्रम घेतले.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


