परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर) दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी शहरातील कौतुभ मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टी च्या वतीने व्यापाऱ्यांचा मेळावा मेडव्या प्रसंगी प्रचंड जन सभेला संबोधतांना ते बोलत होते. तसेच या वेळी त्यांनी तिन्ही पक्षाच्या युतीच्या बळावर महा नगर पालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत विजय घेचून आणू असे आश्वासन कार्यकर्त्यांना या वेळी बबनराव लोणीकर यांनी दिले. या कार्यक्रमाला विजयराव वरपुडकर, राहुल लोणीकर, संतोष मुरकुटे, राजेश देशमुख, डॉ. सुभाष कदम, आनंद भरोसे, बाळासाहेब जाधव, डॉ. प्रफुल्ल पाटील, सुषमा कुलकर्णी, मंगल मुद्गलकर, सुरेश भुम्रे, मोहन कुलकर्णी यांच्या सह मोठ्या संख्येने भाजपा चे कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी बबनराव लोणीकर म्हणाले की चंद्रकांत डहाळे यांनी भारतीय जनता पार्टी ला संपूर्ण महाराष्ट्रातील सुवर्णकार समाज जोडून दिल्याने पक्ष्याचे संघटन मजबूत झाले आहे.
संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


