परभणी (समाजहीत न्यूज वृत्तांत ) :- दिनांक 13/10/2023 रोजी सायंकाळी सात वाजता निरज हॉटेल, गव्हाणे चौक परभणी येथे सद्भावना मंच ची स्थापना करण्यात आली. यावेळी सद्भावना मंचाची स्थापना करण्याचे उद्देश जिल्ह्यात शांती, भाईचारा,आदर,सन्मान,आस्था यासाठी या मंचाची स्थापना करण्यात आलेली आहे सद्भावना मंचाच्या स्थापना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मोहम्मद अकबर मोहम्मद युसुफ हसन (शहराध्यक्ष जमाते -ए-इस्लाम हिंद) प्रमुख पाहुणे मोहम्मद शफी फारुकी सहसचिव सद्भावना मंच विभाग JIH महाराष्ट्र) व्यसनमुक्ती, हुंडाबंदी, दंगा मुक्त महाराष्ट्र जिल्हा व शहर, यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.गोविंद कामटे मनाली की नागरिकांनी शांततेने आणि गुण्यागोविंदाने राहावे समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सध्य परिस्थितीत चालू आहे आणि शांतता भंग करण्याचे काम सध्या चालू आहे. यासाठी सिव्हिल सोसायटीच्या नागरिकांनी अमन आणि शांती समाजात कशी ठेवता येईल यासाठी समाजात जनजागृती करावी. यावेळी मंचाची स्थापना करण्यात आली व पदाधिकारी यांची निवड करण्यात आली सद्भावना मंचाचे अध्यक्ष डॉ.सुनील जाधव, उपाध्यक्ष मोदीतानंद भंतेजी, उपाध्यक्ष नितीन सावंत, उपाध्यक्ष मौलाना अब्दुल रहीम खान नदवी, सचिव - शेख इरशाद, सदस्यपदी डॉ.गोविंद कामटे, विठ्ठल भुसारे, नितीन महाराज गोगलगावकर, अमोल लांडगे, आप्पाराव मोरताटे, राजाप्रभू जाधव, चंदासिंग, मोहम्मद अहमद खान, मोहम्मद जहांगीर नदवी, आसाराम सोळंके, मोहम्मद रफयुद्दीन अशरफी, मोहम्मद कौसर, अँड सूर्यकांत मोघस, प्रशांत वाटोरे, मो.मुफ मुसा, अँड.अमोल गिराम, रामराव नवघरे, सुभाषचंद्र सारडा, मो.मुजीब इर्षाती, हाफेज मगदूम, मोहम्मद जहिर अब्बास, मुंजाजी नरसाळे, गोविंद दुधाटे, शिंदे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


