परभणी (प्रतिनिधी शेख अझहर) दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख मा. वि. जनसेवक धम्मदीप भाऊ रोडे यांच्यामार्फत वार्ड क्रमांक तीन मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध समस्यांबाबत तसेच नागरीसुविधेबाबत महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. वार्ड क्रमांक 3 मधील वांगी रोड, कुशीनगर, तुळजाभवानी नगर, सम्राट नगर, करिमनगर, विश्वास नगर,अंबिका नगर, साईबाबानगर, सरगम कॉलनी, सागर कॉलनी, भीमा कोरेगाव नगर या या ठिकाणी रस्त्यांची अवस्था ही अतिशय दयनीय झाली असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत,तसेच बऱ्याच ठिकाणी नाल्या देखील तुंबलेल्या अवस्थेत आहेत, बऱ्याच ठिकाणी तर नाल्या देखील नाहीत त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, शाळेतील लहान मुले, दिव्यांग बांधव,गरोदर माता भगिनी, आजारी व्यक्ती अबालवृद्ध यांना ये -जा करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, तेव्हा ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या त्या ठिकाणी खड्डे बुजवण्यात यावे, नाल्या व्यवस्थित साफ करण्यात याव्यात, ज्या ठिकाणी नाल्याच नाहीत तिथे तात्पुरत्या स्वरूपात जेसीबीने तरी नाल्या तयार करून देण्यात याव्यात,ज्या ठिकाणी रस्ते, नाल्या, नळ,लाईट यासारख्या मुलभूत सुविधा नाही त्या ठिकाणी कर आकारण्यात येऊ नये , मलेरिया डेंग्यू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागोजागी फवारणी करण्यात यावी, वार्ड क्रमांक 3 मध्ये बऱ्याच ठिकाणी विद्युत पोल वरील लाईट हे बंद अवस्थेत आहेत ते त्वरित चालू करण्यात यावे, वार्ड क्रमांक 3 मध्ये बऱ्याच ठिकाणी घंटागाडी नियमित जात नसून, त्या ठिकाणी घंटागाडी रोज पाठवण्यात यावी, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भीमा कोरेगाव नगर लगत असलेल्या डम्पिंग ग्राउंड मध्ये मृत जनावरे ही उघड्यावरच मानवी वस्ती जवळ आणून टाकली जात आहेत, त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आले आहे, मृत जनावरे ही मानवी वस्ती पासून लांब व खोल खड्डा खंदून नियमाप्रमाणे त्यांची विल्हेवाट लावण्यात यावी, अन्यथा ती मृत जनावरे महानगरपालिका समोर आणून टाकण्यात येतील याची नोंद घ्यावी असे सदरील निवेदनात नमूद केले आहे. या वेळी जनसेवक धम्मदीप भाऊ रोड, संदीप वायवळ, प्रेम तूपसमुद्रे, भीमराव वायवळ, तुषार सोनकांबळे, मनेश गायकवाड, राज वाघमारे, निखिल गवळे, नगरवासी, शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थापक संपादक प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

