परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर) गेली सहा दशकापासून सायकलवर भ्रमण करीत येथील सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले अमृत महोत्सवी वर्ष साजरे केलेले, जेष्ठ पत्रकार मदन ( बापू ) कोल्हे, संपादक धर्मभूमी तथा परभणी जिल्हाध्यक्ष इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली यांच्या कार्याची दखल घेऊन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक / राष्ट्रीय अध्यक्ष मा. संजय देशमुख यांच्या हस्ते दिनांक 7 सप्टेंबर रोजी परभणी शहरातील जुना पेडगाव रोड येथे कार्यक्रमात मदन ( बापू ) कोल्हे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सर्वांशी आपुलकीचे संबंध असलेले मदन (बापू) कोल्हे यांना विविध ठिकाणी यापूर्वी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण' राज्यस्तरीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार व मानपत्रा ने सन्मानित करून गौरविण्यात आलेले आहे . याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. चंद्रकांत गांगुर्डे, जेष्ठ पत्रकार पोलखोलचे संपादक भगीरथ बद्दर , पत्रकार तथा माजी विशेष कार्यकारी अधिकारी देवानंद वाकळे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. मदन (बापू) कोल्हे यांना सन्मानित केल्याबद्दल त्यांचे मित्र परिवारातर्फे अभिनंदन केल्या जात आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

