मानवत / (समाजहित न्यूज वृत्तांत ) मानवत शहरातील सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालयात दही हंडी उत्सव साजरा मोठया उत्सहात साजरा करण्यात आला. जन्माष्टमी निमित्त दहीहंडी गोपाळकाला ०९ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन इयत्ता पहिली ते चौथी च्या सर्व शिक्षकांनी केले. तसेच सांस्कृतिक प्रमुख श्रीमती दिपा भावसार यांनी कार्यक्रमाची सूत्र सांभाळली या मध्ये विद्यार्थी अति उत्साहाने श्रीकृष्ण व राधा यांच्या वेशभूषा साकार करून आले विदयार्थ्यांनी विविध नृत्य दांडिया गाण्याच्या तालावर ती सादर केल्या तसेच पालकांनीही गवळणी भजन व दांडिया या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या साठी पहिली ते चौथीच्या सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले यावेळी सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वभूषण इंगोले पर्यवेक्षक, तसेच विद्यालयाचे समन्वयक डॉ. ओ.बी समदानी यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डी. डी. शिंदे यांनी केले यावेळी कार्यक्रमास अनेक मान्यवर तसेच प्रतिष्टीत नागरिक पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

