परभणी (प्रतिनिधी शेख अझहर) शहरातील शिवनेरी नगर येथील राजकुमार पॅलेस येथे आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी स्मृति. मल्हारराव मनवर यांच्या द्वितीय स्मृतिदिन निमित्त अभिवादन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून व त्रिषरण पंचशील घेऊन स्मृति.मल्हारराव मनवर यांना अभिवादन करण्यात आले व तसेच लहान मुलांना फराळाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श कलावंत कलभूषण शाहीर नामदेव लहाडे हे होते तर प्रा. राजकुमार मनवर, डॉ. अशोक शिरसाठ आदर्श कलावंत कलभूषण शाहीर नामदेव लहाडे, राहुल मोघले,गायिका ललिता शिरसाठ, प्रमोद अंभोरे, शेख अझहर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजकुमार मनवर यांनी केले तर आभार गायिका ललिता शिरसाठ यांनी मानले.

