धर्माबाद (प्रतिनिधी) नारायण सोनटक्के येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वजन काट्याचे शुभारंभ गुरूवारी सकाळी संचालक आनंदराव पाटील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. सदरील वजन काट्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती नियमानुसार जाहिर प्रगटन काढून भाडेतत्त्वावर देण्याचा लिलाव आयोजित केला होता. सदरील लिलावात अनेकांनी भाग घेतला होता.परंतु सदरील लिलावात डॉ.लक्ष्मीनारायण केशटवार यांनी ऐतिहासिक भोली लावून वार्षिक भाडे ६ लाख ५ हजार रुपये देण्याचे मान्य केल्यामुळे सदरील वजन काटा डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार यांना चालविण्यास मिळाला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाच ते सहा वजन काटा आहे. परंतु सदरील काही वजन काट्यामध्ये वजनात तफावत येत असल्याची चर्चा होत आहे. बाजार समितीचा वजन काटा काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडला होता. परंतु शेतकरी , व्यापारी , किरकोळ व्यापारी व इतरांची लूट होऊनये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामचंद्र पाटील बन्नाळीकर व सर्व संचालक मंडळानी सदरील वजन काटा दूरूस्त करून भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामचंद्र पाटील बन्नाळीकर,उपसभापती सौ. गोदावरीबाई चोळाखेकर, संचालक विनायकराव कुलकर्णी, दत्ताहारी पाटील चोळाखेकर, शामसुंदर झंवर, गोविंद पाटील रोशनगावकर, वर्णी नागभुषण, साईनाथ उरेकर, देवन रेड्डी,राजू पाटील बोळसेकर, दत्ताहारी पाटील आवरे, प्रकाश गुजराथी, कृष्णा तिम्मापुरे,शिवाजी पाटील बाभळीकर , सौ. यक्षिणी केशटवार, सौ.नरवाडे, सचिव चंद्रकांत पाटील जुन्नीकर, साहाय्यक सचिन वैभव कुलकर्णी, लेखापाल शाम पाटील अटकाळे, बालाजी पाटील वारले, पिंटू पाटील नरवाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. सदरील वजन काटा २४ तास शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, किरकोळ व्यापारी व जनतेच्या सेवत सुरू राहणार असून मापात पाप होणार नाही. याची हमी बाजार समितीचे सभापती रामचंद्र पाटील बन्नाळीकर, उपसभापती सौ. गोदावरीबाई चोळाखेकर, संचालक विनायकराव कुलकर्णी, सचिव चंद्रकांत पाटील जुन्नीकर, साहाय्यक सचिव वैभव कुलकर्णी व सर्व संचालक मंडळानी आवाहन केले आहे.

