परभणी-(प्रतिनिधी शेख अझहर) महाराष्ट्र विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका ह्या केव्हाही लागू शकतात त्यामुळे कार्यकर्त्यांनो डोळ्यात तेल घालून सज्ज रहा असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष एडवो.संदीप ताजणे यांनी केले. आरक्षण हक्क परिषद व संघटन समीक्षा बैठक हॉटेल ग्रीन लीफ येथे परभणी विधानसभेच्या वतीने घेण्यात आली .याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष एडवो. संदीप ताजने हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी महाराष्ट्र प्रभारी मनीष कावळे महाराष्ट्राचे महासचिव दिगंबर ढोले, प्रदेश कार्यकारणी सदस्य भीमराव जोंधळे, जिल्हा प्रभारी सुनील कोकरे, जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध रणवीर यांची प्रमुख उपस्थित होती .पुढे बोलताना एडवो. ताजणे म्हणाले की या देशात बीजेपी जर कुणाला घाबरत असेल तर त्या फक्त बहन कुमारी मायावती जी या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून देखील संघटन मजबूत करून लोकसभेमध्ये व विधानसभेमध्ये जास्तीत जास्त प्रतिनिधित्व पाठवून बहन जी यांचे हात मजबूत करावे व देशाच्या पंतप्रधान पदी बहन जी यांना बसवावे यावे असे उपस्थित कार्यकर्त्यांना यावेळी आव्हान केले. या प्रसंगी शहराध्यक्ष शुभम धाडवे, समाधान पोटभरे, राजकुमार इंगळे ,मुकेश मस्के ,बाळासाहेब कीर्तने ,शोएब भाई ,राहुल घनसावंत यांच्यासह परभणी विधानसभेतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


