डोंबिवली(कार्य.संपादक)- राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय डोंबिवली या शाळेचा विद्यार्थी कु. श्रेयश सुभाषराव अंभोरे याची वर्ल्ड शोटोकन कराटे ऑर्गनायझेशन यांनी आयोजीत केलेल्या 11 व्या राष्ट्रस्तरीय कराटे चॅम्पियनशिप या स्पर्धसाठी डोंबिवली ठाणे, महाराष्ट्रातुन निवड झाली होती. सदर स्पर्धा ही दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई मुलुंड येथे घेतली होती. या स्पर्धेत कु.श्रेयश यांनी अपेक्षा प्रमाणे सुवर्ण पदक पटकावले आहे. कु.श्रेयश ला कराटे प्रशिक्षण देण्याचे प्रशिक्षक श्री. रेड्डी सर यांनी केले आहे. कु. श्रेयश अंभोरे हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले डोंबिवली शहर उपाध्यक्ष तसेच समाजहित न्यूज चे कार्यकारी संपादक ॲड. सुभाष अंभोरे यांचे चिरंजीव आहे. कु. श्रेयश अंभोरे यांनी सुवर्ण पदक मिळवल्या बद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.



